फाेटाे ११ मार्च
प्रस्ताव तपासणीचे काम सुरू
अकोला : जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षकांच्या प्रस्ताव तपासणीचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. त्यामध्ये प्रस्तावातील त्रुटीची दुरुस्ती करुन प्रस्ताव अद्ययावत करण्याचे काम करण्यात येत आहे.
............................................
‘शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत करा’
अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील त्रुटीची दुरुस्ती करुन याद्या अद्ययावत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांच्या संबंधित नायब तहसीलदारांना बुधवारी दिले.
....................................................
रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
अकोला : शहरातील अकोटफैल नाक्यापासून दमानी आय हाॅस्पिटलपर्यंत रस्ता कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे; मात्र रस्त्याचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नसल्याने या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून, वाहनधारकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.
..................................................
कोविड सेंटरमधील व्यवस्थेची पाहणी
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शहरातील समाजकल्याण विभागांतर्गत वसतिगृहात सुरू कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून, या कोविड केअर सेंटरमधील व्यवस्थेची पाहणी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांनी बुधवारी केली.