शासनाने जाहीर केलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरण योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे वीजबिल थकीत आहे. त्यांच्या जनजागृतीसाठी विविध प्रकारच्या माध्यमातून प्रसार केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर दानापूर येथील महावितरण कंपनीचे अभियंता गजानन तायडे यांच्या नेतृत्वाखाली एस.एम. दारोकर, एस.डी. फोकमारे, शबानाबी रहेमान यांच्या पुढाकाराने वीज वितरण कंपनी अंतर्गत येत असलेल्या दानापूर, सौंदळा, हिंगणी बु, हिंगणी खु., वारखेड आदी गावांमधॅल शेतकऱ्यांनी कृषिपंपाचे वीजबिल भरून महावितरणला सहकार्य केले. त्याबद्दल महावितरणच्या दानापूर कार्यालयात अभियंता गजानन तायडे यांच्या उपस्थितीत शेतकरी रामभाऊ घायल यांचा सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बी.एस. फोकमारे, भूषण साबळे, संजय राऊत यावेळी उपस्थित होते. यावेळी शेतकरी केशव विखे, महादेव घायल, सिंधू लोनाग्रे, चिराग गांधी, शंकर वानखडे, कांताबाई टावरी आदींचा सत्कार करण्यात आला.
फोटो: मेल फोटाेत