यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, निवडणुकीच्या कामामध्ये महिला बीएलओंनी मतदारांची नोंदणी करण्याची महत्त्वाची कामगिरी केली आहे. घरोघरी भेटी देऊन नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादीमधील दुरुस्तीचे असे महत्त्वाची कामे करत असतात. यामुळे अचूक मतदारांची नोंद होऊन लोकशाही बळकट होण्यास मदत होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवदास शेलार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सोनल शिंदे, अर्पणा ढोरे, सुरेखा वाहने, प्रतिभा जोशी, सविता पोटे, सविता वानखडे, अकोला तहसील कार्यालयाचे मतदार साक्षरता क्लबच्या उमा गावंडे, वर्षा ठाकरे, वनीता मडावी, शोभा तायडे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवडणूक कार्यालयाचे नायब तहसीलदार घुगे, वैद्यनाथ कोरकाने, उमेश वैद्य, दिनेश सोनोने, पीयूष वानखडे यांनी सहकार्य केले.