शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

विमा काढण्यात आशा स्वयंसेविका उदासीन

By admin | Published: October 29, 2016 2:49 AM

अकोला जिल्ह्यातील ७५ टक्के स्वयंसेविकांनी विमाच काढला नाही!

संदीप वानखडे अकोला, दि. २८- गावोगावी जाऊन महिलांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार्‍या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात विमा काढण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला आशा स्वयंसेविकांचा मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील केवळ २५ टक्के आशा सेविकांचा विमा काढण्यात आला असून ७५ टक्के सेविकांना अजूनही विम्याची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागावर कार्यरत आशा स्वयंसेविकांना वेळोवेळी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी स्थानिक वाहनाने ये-जा करावी लागते. या सेवेदरम्यान स्वयंसेविकांच्या मृत्यूच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे, ग्रामीण पातळीवर काम करणार्‍या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना विम्याचे कवच मिळावे, या उदात्त हेतूने शासनाने विमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्यासाठी ९.१७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर निधीतून नियुक्त सर्व आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांना विम्याचा लाभ मिळणार आहे; मात्र विमा काढण्यात पातूर आणि बाश्रीटाकळी तालुक्यात प्रतिसादच मिळाला नाही तर अकोटात ६, अकोला तालुक्यात ३७, बाळापुरात ४३ आशा सेविकांनीच विमा काढला आहे. मूर्तिजापूर तालुक्यात मात्र सर्वच आशा सेविकांनी लाभ घेतला आहे. १२ रुपयात विमा या विमा योजनेंतर्गत केवळ १२ रुपयांमध्ये हा दोन लाखांचा विमा काढण्यात येत आहे. ही रक्कम आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यातून कपात केली जात असून त्याचा परतावा त्यांना शासनाकडून देण्यात येत आहे. १८ ते ५0 वर्षाच्या आशा सेविका व गटप्रवर्तक यांचा विमा काढण्यात येत आहे. या विम्यासाठी आशाचे बँक खाते आधार कार्ड क्रमांकासह संलग्न करणे गरजेचे आहे. बँक खाते नसल्यास आधारकार्डची प्रत जमा करून विमा काढला जाणार आहे.बँकामध्ये निघतो विमा बँकेमध्ये आशा सेविकांनी जाऊन विमा काढण्यासाठी संमती द्यावी लागते, त्यानंतर बँके कडून १२ रुपयांची कपात करण्यात येते. तर यासंबंधीचा पुरावा दिल्यास शासनाकडून १५ रुपये जमा करण्यात येतात. मध्यंतरी काही काळासाठी योजना बंद होती. त्यामुळे अनेक बँक शाखांनी प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा सुरू झालेली आहे. आशा सेविकांच्या अडचणी जाणून घेतल्या. विम्यापासून वंचित राहिलेल्यांना आशा सेविकांनी विमा काढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बँकांकडूनही आता प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच सर्व आशा सेविकांचा विमा काढण्यात येईल. आशा सेविकांनीही विमा काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. -सचिन उनवणे, जिल्हा समूह संघटक, आशा युनिक अकोला.