शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रुग्णालयांची तपासणी आणखी महिनाभर; बोगस डॉक्टर रडारवर

By admin | Published: April 27, 2017 7:01 PM

अकोला- ग्रामीण व महापालिका क्षेत्रात एकूण ९८ रुग्णालये व गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. महिनाभराची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ही मोहीम १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

महापालिका, ग्रामीण क्षेत्रात ९८ रुग्णालयांची तपासणीअकोला : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे भ्रूणहत्या रॅकेट उघडकीस आल्याच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार गत महिन्यात राज्यभरात सुरू झालेली खासगी रुग्णालये, दवाखाने व गर्भपात-सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम आणखी १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ग्रामीण व महापालिका क्षेत्रात एकूण ९८ रुग्णालये व गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. ही मोहीम १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार होती; परंतु आता या मोहिमेला महिनाभराची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ही मोहीम १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवायांचा अहवाल शासनाकडे सुपूर्द करण्यात आला असून, ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळलेल्या डॉक्टर व रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने १६ मार्चपासून रुग्णालयांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी महापालिका क्षेत्र व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत तालुका पातळीवरील रुग्णालयांच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथके गठित करण्यात आली. प्रत्येक पथकात एक स्त्री व एक पुरुष वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचा अधिकारी, दोन कर्मचारी व पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या तपासणी मोहिमेच्या कक्षेत रुग्णालये, प्रसूतीगृहे, क्लिनिक, दवाखाने, सोनोग्राफी केंद्र यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात एकूण २४७ रुग्णालये असून, त्यात ६० गर्भपात केंद्र व सोनोग्राफी केंद्रांचा समावेश आहे. गत महिनाभरात या मोहिमेदरम्यान महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने २९ रुग्णालयांची तपासणी केली, तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तालुका स्तरावरील ६९ खासगी रुग्णालये, दवाखान्यांची तपासणी केली. यापैकी ५१ खासगी दवाखान्यांमध्ये विविध नियमांचे उल्लंघन आढळून आले. आतापर्यंत तालुका स्तरावरील १७ पैकी १० गर्भपात केंद्र व २० पैकी १७ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींचा अहवाल तयार करून जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवण्यात आला आहे. तालुका स्तरावरील खासगी रुग्णालये व दवाखान्यांची तपासणी मोहीम सुरू असून, ही मोहीम आणखी महिनाभर सुरू राहणार आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.रुग्णालय तपासणीच्या मोहिमेस १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २९ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून, आढळून आलेल्या त्रुटींचा अहवाल जिल्हास्तरीय समितीला सुपूर्द करण्यात आला आहे. - डॉ. फारुख शेख, आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला.