कुठल्याही हाॅटेलमध्ये खानसामा हा पुरुष असला तरी पाेळी व भाकरी बनविण्यासाठी महिलांनाच राेजगार मिळताे. अकाेल्यातही अनेक हाॅटेलमध्ये महिला कारागीर काम करतात. हाॅटेमध्ये ग्राहकच नाही म्हटल्यावर साहजिकच कामगार कपातीची कुऱ्हाड अशा महिला कामगारांसह वेटरवरही आली आहे.
............
काेराेनाचे वर्ष राेजगाराच्या चिंतेतच गेले
काेराेनाच्या पहिल्या लाॅकडाऊनमध्ये हे लाॅकडाऊन संपेल अशा आशेवर हाॅटेल मालकांनीही आधार दिला, धान्य दिले. मात्र लाॅकडाऊन वाढत गेले अन् हाॅटेलचा व्यवसाय पूर्ण ठप्प झाल्याने राेजंदारी गेली फक्त पार्सलच सुरू झाल्याने पाेळी, भाकरीची मागणी कमी झाली. त्यामुळे साहजिकच अनेक महिलांनी घरकाम शाेधले.
आताही हाॅटेल फक्त पार्सलवरच आहेत. त्यामुळे एका हाॅटेलमध्ये सहा महिलांच्या ऐवजी केवळ दाेन महिला कामगार ठेवल्या जात आहे.त त्यामुळे अजूनही राेजगाराची चिंता कायमच आहे.
.......................
पाेळी, भाकरी करण्याचे काम मी कित्येक वर्षांपासून करत आहे. या लाॅकडाऊनमुळे हाॅटेलच सुरू नाहीत. त्यामुळे आमच्यापैकी अनेकींना राेजगार उरलेला नाही.
कावेरी राऊत
.......................
एका हाॅटेलमध्ये पाच ते सहा महिला पाेळी, भाकरी करण्याचे काम करतात. आता फक्त पार्सल सुविधा असल्याने एवढ्या महिलांना काम नाही. आमचे हातावरच पाेट आहे. या महिलांनी राेजगार शाेधावा तरी कुठे?
उमाबाई हिवरगडे
........................
कॅटरिंग, हाॅटेल हे धंदे बंद पडल्याने पाेळ्या बनविण्याचे काम फारसे राहिलेले नाही. आमच्यापैकी काही महिलांनी घरकाम शाेधले पण काेराेनामुळे घरकामही मिळत नाही.
फुलाबाई लहासे
.......
एकूण हाॅटेल २४८
महिलांची संख्या १३००