यामध्ये २१ ते ३० वर्षांआतील तरुणांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने अकोला जिल्ह्यातून सर्वाधिक रुग्ण आढळलेले कुरणखेड गाव कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. गावातील आढळलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे घरोघरी जाऊन औषधोपचार दिवसातून तीन वेळा देऊन त्यांची तपासणी केली जात आहे. रुग्ण आढळलेल्या घरच्या मंडळींनी आपली तपासणी करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. मंगळवारी कुरणखेड येथे उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन पाहणी केली. यावेळी जे व्यावसायिक टेस्ट करणार नाहीत त्यांच्या दुकानाला सील लावण्याचे आदेश ग्रामपंचायतला देण्यात आले आहेत. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे, सहायक गटविकास अधिकारी मदनसिंग बहुरे, बोरगाव मंजूचे ठाणेदार सोळंके, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. खुदेजा बेगम, डॉ. प्रिया सानप, मंडळ अधिकारी देशमुख, तलाठी योगेश भगत, ग्रामसेवक धाडसे, पोलीस पाटील प्रज्ञा जामनिक, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पांडे, अमन महल्ले उपस्थित होते.
फोटो :