कावसा : येथील एका घरात ठेवलेल्या कापसाला लागून जवळपास २० क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना ८ जानेवारी राेजी सकाळी उघडकीस आली. घरात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या पंख्यातून शाॅर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
येथील सुनील पांडुरंग इचे यांच्या घरात ७० क्विंटल कापूस ठेवलेला हाेता. काही दिवसांपासून ते बाहेरगावी असल्यामुळे घर बंद हाेते. शुक्रवारी त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. गावातील नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील २० क्विंटल कापूस आगीत जळून खाक झाला. दरम्यान, अकाेट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलानेही शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर घटनास्थळी तलाळी खर्चे, पाेलिसपाटील नीळकंठराव सावरकर यांनी धाव घेत नुकसानीचा पंचनामा केला.