अकोला: पातूर रोडवरील इन्स्पेक्टर नगरातील एका घरातील कत्तलखान्याचा जुने शहर पोलिसांनी शनिवारी सकाळी पर्दाफाश केला. पोलिसांनी एकास अटक करून त्याच्या ताब्यातील १६ बैलांची सुटका केली. जुने शहरचे पोलीस निरीक्षक रियाज शेख यांना गोवंशाची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पातूर रोडवरील इन्स्पेक्टर नगरमधील शेख इरशाद शेख रहीम (२६) याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी शेख इरशाद हा त्याच्या घरात कत्तलखानाच चालवित असल्याचे दिसून आले. तसेच घराच्या एका खोलीत १६ बैलांना डांबून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी शेख इरशादला अटक करून त्याच्याकडील बैलांची सुटका केली. बैलांची किंमत तीन लाख २0 हजार रुपये आहे. बैलांना गोरक्षण संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले.
घरातील कत्तलखान्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश!
By admin | Published: May 07, 2017 2:46 AM