लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली. विविध मतदारसंघामध्ये अकोला जिल्हय़ातून ३५ उमेदवार रिंगणात होते. सिनेट निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी अमरावती विद्यापीठात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये नुटा, विजुक्टा, अभाविप, शिक्षक मंच यासह अनेक संघटनांचे उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांमधून कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार बाजी मारतो आणि अकोला जिल्हय़ातील किती उमेदवारांना सिनेटवर जाण्याची संधी मिळते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दर पाच वर्षांनी अमरावती विद्यापीठामध्ये विविध मतदारसंघांसाठी सिनेटची निवडणूक होते. यावर्षी अमरावती विद्यापीठांतर्गत सिनेट निवडणुकीसाठी २0५ उमेदवार विविध मतदारसंघामधून उभे होते. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पदवीधारकांची नोंदणी करण्यात आली. शिक्षक संघटनांसह शिक्षक मंच, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पदवीधारकांची नोंदणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले; परंतु रविवारी झालेल्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघामध्येच सर्वात कमी मतदान झाले आणि सर्वाधिक उमेदवार याच मतदारसंघामध्ये रिंगणात आहेत. त्यामुळे पदवीधर मतदारसंघामध्ये अकोल्यातून कोण बाजी मारतो, हे औत्सुक्याचे ठरेल. पदवीधर मतदारसंघामध्ये अकोल्यातून विविध प्रवर्गामध्ये उमेश कुडमेथे, अनिता काळमेघ, विवेक बोचे, डॉ. अविनाश बोर्डे, संजय देशमुख, समीर गडकरी, गजानन मानकर, रवींद्र तायडे रिंगणात होते. परंतु यापैकी कोणत्या प्रवर्गातून कोण निवडून येतो, याकडे पदवीधरांचे लक्ष आहे. प्राचार्य मतदारसंघामध्ये विविध प्रवर्गात डॉ. श्रीप्रभु चापके, डॉ. मधुकर पवार, डॉ. अंबादास कुलट, डॉ. जगदीश साबू, डॉ. संतोष ठाकरे, शिक्षक मतदारसंघामधून डॉ. ज्ञानदेव इंगळे, डॉ. ममता इंगोले, प्रा. विवेक हिवरे, प्रा. रवींद्र मुंडरे, डॉ. दिनकर उंबरकर, तर अभ्यास मंडळ मतदारसंघामधून डॉ. आनंद काळे, अनिल ठाकरे, डॉ. बंडू किर्दक, संध्या काळे, विजय भगत, श्रीकांत सातारकर, डॉ. मुकुंद इंगळे, श्रीकृष्ण काकडे, संतोष ठाकरे, डॉ. किरण खंडारे, भास्कर पाटील, मो. अमजद असदुल्लाह काझी, डॉ. किशोर देशमुख, डॉ. प्रशांत कोठे आदी उमेदवार रिंगणात होते. या सर्व मतदारसंघामधे अमरावती, बुलडाणा, यवतमाळ व वाशिममधील उमेदवारसुद्धा रिंगणात होते. त्यामुळे आता पदवीधर, शिक्षक, प्राचार्य, अभ्यासमंडळ, शिक्षणसंस्था प्रतिनिधी मतदारसंघात अकोल्यातील किती उमेदवारांना सिनेटवर जाण्याची संधी मिळते, याकडे अकोल्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
किती उमेदवार मारणार बाजी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:18 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली. विविध मतदारसंघामध्ये अकोला जिल्हय़ातून ३५ उमेदवार रिंगणात होते. सिनेट निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी अमरावती विद्यापीठात मतमोजणी होणार आहे.
ठळक मुद्देसिनेट निवडणूक आज मतमोजणी, शिक्षण क्षेत्राचे लक्ष