अकाेलेकरांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केेला जात असून, पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महान येथे ६५ व २५ एमएलडीचे दाेन प्लांट कार्यरत आहेत. याठिकाणी पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ९०० व ६०० व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरातील २२ पैकी १५ जलकुंभांपर्यंत पाणी पाेहाेचविल्या जाते. त्यानंतर नियाेजित वेळापत्रकानुसार शहरवासीयांना दर चाैथ्या दिवशी पाणी उपलब्ध केल्या जात आहे. दरम्यान, पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी जलप्रदाय विभागाकडून दरराेज किमान सहा ते सात नमुने घेतल्या जातात. त्यांची जिल्हा आराेग्य प्रयाेगशाळेत तपासणी केली जाते. तपासणीअंति शहरवासीयांना दिल्या जाणारे पाणी शुद्ध असल्याचा अहवाल प्रयाेगशाळेकडून प्राप्त हाेत असल्याचा दावा मनपाकडून केला जाताे.
महिन्याकाठी १८० नमुन्यांची तपासणी
मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून पाण्याचे दरराेज सहा किंवा सात नमुने जमा केले जातात. यामध्ये जलकुंभातील आउटलेटमधून निघणाऱ्या पाण्याचे तीन व जलवाहिनीवरील शेवटच्या टाेकावर असलेल्या तीन नळ धारकांकडून नमुने जमा केले जातात. महिन्याकाठी पाण्याचे १८० नमुने घेतले जातात. ही प्रक्रिया दरराेज झाेननिहाय राबविली जात असल्याची माहिती आहे.
अशी हाेते तपासणी
पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी नमुने जमा केले जातात. त्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नमुने जिल्हा आराेग्य प्रयाेगशाळेत पाठविले जातात. याठिकाणी पाण्यातील गाळ, सूक्ष्म जीवजंतू आदी तपासणी केली जाते. प्रशासनाच्या पाण्यामध्ये १४० ते १६० ‘टीडीएस’ असून पाणी शुद्ध असल्याचा दावा केला जाताे.
शहराची लाेकसंख्या
५, ५७०००
१००
लिटर प्रति माणसी दरराेज दिले जाते पाणी
१५
जलकुंभांद्वारे पाणी वितरणाची प्रक्रिया
१ जलशुद्धीकरण केंद्र
शहरवासीयांचे आराेग्य लक्षात घेता त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा हाेईल, याकडे जलप्रदाय विभागाचे लक्ष आहे. जलवाहिनीला गळती लागल्यावरच कधीतरी दूषित पाणीपुरवठा हाेताे. या विभागात बाेटावर माेजता येणारे कर्मचारी असले तरी कामाप्रति त्यांची निष्ठा दिसून येते.
- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा