अकोला : कोरोना संकट काळात उत्सव विशेष म्हणून सुरु असलेल्या गाड्यांना मुदतवाढ देण्यात येत आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून अनेक उत्सव गाड्यांना मार्च अखेर व एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामध्ये हावडा-लोकमान्य तिलक टर्मिनन्स (एलटीटी) एक्स्प्रेस या आठवड्यातून दोन वेळा धावणाऱ्या गाडीसह साप्ताहिक गाड्यांचा समावेश असून, या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावर थांबा आला आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्सव विशेष गाड्यांमध्ये समाविष्ठ असलेली ०२१०१ एलटीटी-हावड़ा ही गाडी ३० मार्चपर्यंत धावणार आहे. तसेच ०२१०२ हावड़ा-एलटीटी ही गाडी १ एप्रिलपर्यंत आठवड्यातून दर रविवार आणी बुधवार अशी दोन वेळा धावणार आहे.
०१२३५ नागपुर-मडगांव ही उत्सव विशेष गाडी २६ मार्च आणि ०१२३६ मडगांव-नागपुर ही गाडी २७ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. त्याचप्रमाणे ०२८७९ एलटीटी-भुवनेश्वर ही गाडी ३१ मार्चपर्यंत प्रस्थान स्थानकावरून दर बुधवार व शनिवारी, तर ०२८८० भुवनेश्वर-एलटीटी ही गाडी २९ मार्चपर्यंत दर सोमवार व गुरुवारी प्रस्थान स्थानकावरून धावणार आहे.
या गाड्या पूर्णपणे आरक्षीत असून, प्रवास करताना कोविड १९ नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
साप्ताहिक गाड्यांचाही विस्तार
अकोल्यात थांबा असलेल्या साप्ताहिक गाड्यांपैकी ०२८५८ एलटीटी-विशाखापट्टनम ही गाडी ३० मार्चपर्यंत दर मंगळवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होईल. तर ०२८५७ विशाखापट्टनम-एलटीटी ही गाडी २८ मार्चपर्यंत दर रविवारी विशाखापट्टनम येथून रवाना होईल.
०८५०१ विशाखापट्टनम-गांधीधाम ही विशेष गाडी २५ मार्चपर्यंत दर गुरुवारी विशाखापट्टनम येथून रवाना होईल. तर ०८५०२ गांधीधाम-विशाखापट्टन ही विशेष गाडी २८ मार्चपर्यंत दर रविवारी गांधीधाम स्थानकावरून निर्धारित वेळेला रवाना होईल.