अकोला : रेल्वेगाड्यांमध्ये होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वने रविवार, १४ फेब्रुवारीपासून पुणे आणि हावडा दरम्यान दररोज विशेष सुपरफास्ट रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला अकोल्यात थांबा देण्यात आल्यामुळे अकोलेकरांची सोय झाली आहे.
गाडी क्र. ०२२८० अप हावडा-पुणे सुपरफास्ट ही विशेष गाडी १४ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत हावडा स्टेशन येथून दररोज २२.१० वाजता सुटेल आणि पुण्याला तिसऱ्या दिवशी ०७.०५ वाजता पोहोचेल. ही गाडी दररोज १९.४७ वाजता अकोला स्थानकावर येऊन १९.५० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.
०२२७९ डाउन सुपरफास्ट पुणे-हावडा सुपरफास्ट ही विशेष गाडी १६ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत पुणे येथून दररोज १८.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी हावडा येथे ०३.५५ वाजता पोहोचेल. ही गाडी दररोज ०५.२५ वाजता अकोला स्थानकावर येऊन ०५.३० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.
या गाडीला भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, भंडारा रोड, तुमसर, गोंदिया आदी ठिकाणी थांबा असणार आहे.
ही गाडी पूर्णपणे आरक्षीत असून, त्यासाठी १२ फेब्रुवारीपासून पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण करता येणार आहे.