ऑनलाइन लोकमत
हिंगणी बु. ( जि.अकोला ), दि. २ - विदर्भ माऊली गुरुवर्य श्रीसंत वासुदेव महाराज जन्मशताब्दी महोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात ७०० हून अधिक भाविक पारायणात बसले आहेत. त्यात ५०० महिलांचा समावेश आहे.उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. २०१६-१७ या शताब्दी वर्षातील ५२ सप्ताहापैकी ३५ व्या क्रमांकाचा हा पारायण सोहळा हिंगणी बु. येथे सुरू आहे.२८ आॅक्टोबरपासून प्रारंभ झालेल्या या महोत्सवाची ४ नोव्हेंबर रोजी सांगता होईल. या दरम्यान महाराष्टÑातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. महोत्सवाची सुरुवात हभप मंगळे महाराज (बेलुरा) यांची तीर्थस्थापना करून केली.
या उत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक हभप विठ्ठल महाराज कोरडे हे आहेत. ज्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. असे महाराष्टÑातील नामवंत हभप एकनाथ महाराज कोष्टी यांच्याकडे व्यासपीठ नेतृत्व आहे. महोत्सवात हभप सुदाम महाराज शास्त्री (आळंदी), हभप रामेश्वर महाराज शास्त्री (आळंदी), हभप विलास महाराज गेजगे (आळंदी), उमेश महाराज दशरथे (आळंदी), हभप निरंजन महाराज शिंदे (नांदेड), हभप पांडुरंग महाराज घुले गाथा मंदिर अध्यक्ष (देहू) यांचा समावेश असून कार्यक्रमाची सांगता गायनाचार्य पंढरीनाथ महाराज आरू यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. (वार्ताहर)
पुणेकरांची खास उपस्थिती
२८ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या या सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील १०० हून अधिक भाविक हिंगणी येथे आले आहेत. त्यात नामवंत महाराजांचा समावेश आहे. पुणेकरांच्या उपस्थितीने या सोहळ्यास वेगळाच साज चढलाय. त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था गावकºयांनी केली आहे.