लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कंपोझिशन स्कीमच्या शेवटच्या चरणात अकोल्यातील पाचशेच्या वर व्यापारी-उद्योजकांनी कंपोझिशन स्कीममध्ये नोंद केली आहे. शनिवार, ३0 सप्टेंबर हा कंपोझिशन स्कीमचा शेवटचा दिवस असल्याने अकोल्यातील व्यापारी-उद्योजक आणि कर सल्लागारांनी आधीच रजिस्ट्रेशन करून कंपोझिशनचा लाभ घेतला. जुलैपासून देशभरात जीएसटी कायद्याची अंमलबजावणी झाली. मात्र, अजूनही जीएसटीच्या नवीन कायद्याची संपूर्ण माहिती अधिकारी, कर सल्लागार आ.णि व्यापारी-उद्योजकांना नाही. दरम्यान, जीएसटी परिषदेने ७५ लाखांच्या आत वार्षिक उलाढाल असलेले आणि क्रेडिटची कोणतीही अपेक्षा न ठेवणार्या व्यापारी-उद्योजकांसाठी जीएसटीची कंपोझिशन (आपसमेळ) स्कीम घोषित केली. मात्र, या स्कीमसाठी सुरुवातीला १६ ऑगस्ट १७ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. हा कालावधी कमी पडत असल्याची ओरड देशभरातून झाली. जीएसटी पोर्टलवर अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर जीएसटी परिषदेने हैदराबादच्या बैठकीत कंपोझिशन स्कीमच्या तारखेत वाढ केली. ३0 सप्टेंबर पर्यंत नोंदणीची तारीख वाढविली. त्यामुळे देशभरातील व्यापारी-उद्योजकांना दिलासा मिळाला. अकोल्यातील करसल्लागारांनीदेखील कंपोझिशनसंदर्भात मुदत वाढविण्याची तक्रार केली होती. अकोल्यातील शेकडो उद्योजक यापासून वंचित राहिल्याचे कळविण्यात आले होते. दरम्यान तारखेत वाढ केल्याने अकोल्यातील पाचशेच्या जवळपास व्यापार्यांनी या स्कीमचा लाभ घेतला आहे. ही माहिती करसल्लागार आणि विधिज्ञांनी दिली आहे. ३0 सप्टेंबर १७ दसर्याचा दिवस या स्कीमसाठी अखेरचा असल्याने शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी होण्याची शक्यता आहे. -
अकोल्यातील शेकडो उद्योजक आले कंपोझिशन स्कीममध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 1:41 AM
अकोला : कंपोझिशन स्कीमच्या शेवटच्या चरणात अकोल्यातील पाचशेच्या वर व्यापारी-उद्योजकांनी कंपोझिशन स्कीममध्ये नोंद केली आहे. शनिवार, ३0 सप्टेंबर हा कंपोझिशन स्कीमचा शेवटचा दिवस असल्याने अकोल्यातील व्यापारी-उद्योजक आणि कर सल्लागारांनी आधीच रजिस्ट्रेशन करून कंपोझिशनचा लाभ घेतला.
ठळक मुद्दे३0 सप्टेंबर स्कीमचा लाभ घेण्याचा शेवटचा दिवस