शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविला वखर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 1:15 PM

अकोला : जिल्ह्यात आजमितीस ८७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली; परंतु पावसाने दीर्घ दडी मारली असून, पिके करपू लागल्याने शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर वखर फिरविला आहे.

अकोला : जिल्ह्यात आजमितीस ८७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली; परंतु पावसाने दीर्घ दडी मारली असून, पिके करपू लागल्याने शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर वखर फिरविला आहे.जिल्ह्यात खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र ४ लाख ८० हजार ५८६ हेक्टर आहे. कृषी विभागाने यावर्षी ४ लाख ८० हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होेते. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख १७ हजार ५६ हेक्टर, ८७ टक्के पेरणी झाली आहे. यात कापूस पेरणीचे उद्दिष्ट १ लाख ६५ हजार होते. तथापि, १ लाख ४७ हजार ७९२ हेक्टर ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे जिल्ह्यात सरासरी क्षेत्र २ लाख ३ हजार ५ हेक्टर आहे.यावर्षी १ लाख ६५ हजार पेरणीचे उद्दिष्ट होते.त्यापैकी १ लाख ७५ हजार ४१ हेक्टरवर ८६ टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे. तूर ५५ हजार ३० हेक्टर म्हणजेच ९४ टक्के, मूग १६ हजार ९७३ हेक्टर म्हणजेच ५६ टक्के पेरणी करण्यात आली आहे. उडिदाचे सरासरी क्षेत्र जिल्ह्यात ११ हजार ९७८ हेक्टर आहे. यावर्षी १२ हजार ५९८.८ हेक्टर म्हणजे १०५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीची पेरणी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुधारली आहे. २२,७१५ हेक्टर सरासरी ज्वारीचे क्षेत्र आहे. १८ हजार ६०० पेरणीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८ हजार ८०३.७ हेक्टरवर ३९ टक्के पेरणी झाली आहे.अकोला तालुक्यात सर्वाधिक १ लाख ६ हजार २८० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. कृषी विभागाने १ लाख ४ हजार ४४० हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी आजमितीस ८९,४४२ हेक्टर म्हणजेच ८४ टक्के पेरणी आटोपली. बाळापूर तालुक्यात सरासरी ६० हजार १६ हेक्टरच्या तुलनेत ६१ हजार १८७ हेक्टरवर पेरणी झाली. अकोट तालुक्यात सरासरी ६८,४३४ हेक्टरच्या तुलनेत ६६ हजार २९८ हेक्टरवर ९७ टक्के पेरणी झाली. तेल्हारा तालुक्यात ५६ हजार ६६८ सरासरी क्षेत्रापैकी ४३,७८७ हेक्टरवर ७७ टक्के पेरणी झाली. बार्शीटाकळी तालुक्यात सरासरी ६३,४९४ हेक्टरपैकी ५४,५५२ हेक्टरवर ८६ टक्के पेरणी झाली.

- अनेक भागात पेरण्या उलटल्या!यावर्षी पावसाने विलंब केल्याने उशिरा पेरण्या झाल्या. त्यानंतर प्रदीर्घ दडी मारल्याने पिके करपल्याने शेतकºयांनी त्यावर वखर फिरविला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी