शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

माहेरच्यांनी पत्नीचे अपहरण केल्याची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 11:09 AM

अकोला : पत्नीला गणेशोत्सवासाठी माहेरी बोलावून माहेरच्यानी तिचे अपहरण केल्याची तक्रार पतीने सिव्हिल लाइन्स तसेच जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. 

अकोला : पत्नीला गणेशोत्सवासाठी माहेरी बोलावून माहेरच्यानी तिचे अपहरण केल्याची तक्रार पतीने सिव्हिल लाइन्स तसेच जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. वाशिम बायपास परिसरातील यशवंत नगरमधील रहिवासी प्रफुल्ल प्रल्हाद धाडसे यांचा मोठी उमरीतील रहिवासी माधुरी चव्हाण-धाडसे हिच्याशी प्रेमविवाह झाला. त्यानंतर गत मार्च महिन्यापासून ते दोघेही सोबत राहत होते. दरम्यान, माधुरीच्या आई-वडिलांनी दोघांनाही गणपती स्थापनेसाठी २१ आॅगस्ट रोजी मोठी उमरी येथील घरी बोलावले. त्यानंतर गणपती स्थापना तसेच कार्यक्रम पार पडल्यानंतर माधुरीचे कुटुंबीय सागर चव्हाण, प्रताप चव्हाण व वनमाला चव्हाण यांनी माधुरीला एक दिवस मुक्काम करण्याची विनंती केली. त्यानुसार प्रफुल्ल चव्हाण यांनी पत्नीला माहेरी सोडून घरी परतले. तसेच दुसऱ्या दिवशी पत्नीला आणण्यासाठी गेले असता त्यांची पत्नी तिथे नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पत्नी कुठे आहे, या संदर्भात विचारणा केली असता तिच्या कुटुंबीयांनी टाळाटाळ केली. त्यामुळे माधुरीचे पती प्रफुल्ल धाडसे यांनी पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात केली असून, तिचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला