शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

मी नरेंद्र मोदी बोलतोय... जिल्हा संघचालकांना मोदींनी स्वत:हून केला होता फोन

By admin | Published: May 26, 2014 9:28 PM

नमस्कार...संघचालकजी, मी गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बोलतोय...अशा शब्दात देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून जिल्हा संघचालकांना फोन केला आणि अकोला अर्बन बँकेच्या नूतन वास्तू लोकार्पण कार्यक्रमाला येत असल्याचे सांगितले. एवढी विनम्रता आणि निष्ठा पाहून जिल्हा संघचालक भारावून गेले होते.

अकोला: नमस्कार...संघचालकजी, मी गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बोलतोय...अशा शब्दात देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून जिल्हा संघचालकांना फोन केला आणि अकोला अर्बन बँकेच्या नूतन वास्तू लोकार्पण कार्यक्रमाला येत असल्याचे सांगितले. एवढी विनम्रता आणि निष्ठा पाहून जिल्हा संघचालक भारावून गेले होते. एका राज्याचा मुख्यमंत्री स्वत:हून फोन करतो. ही बाब निश्चितच आनंददायी होती. एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर संघ स्वयंसेवक म्हणून केलेला हा फोन होता. सोमवारी सायंकाळी नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी केलेल्या फोनच्या आठवणीला या निमित्ताने उजाळा मिळाला. २00३ सालची घटना आहे. अकोला अर्बन बँकेच्या नूतन वास्तू लोकार्पण सोहळ्याला कोणत्या प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित करावे, याविषयी बँकेचे संचालक आणि संघाच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा झाली. त्यावेळचे रा.स्व. संघाचे प्रांत प्रचारक रवी भुसारी यांच्या कानावर ही बाब गेली. त्यांनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांचे आणि नरेंद्र मोदी यांचे नाव सुचविले; परंतु मोदींशी संपर्क साधणार कोण? याची जबाबदारी रवी भुसारी यांनी घेतली. त्यांनीच नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून त्यांना बँकेच्या वास्तू लोकार्पण सोहळ्याला येण्यासाठी वेळ मागितली आणि त्यावेळचे जिल्हा संघचालक आणि बँकेचे अध्यक्ष ॲड. दादा देशपांडे यांना तुम्हाला फोन करायला सांगतो असे सांगितले. त्यावर नरेंद्र मोदी यांनी वो संघचालकजी है। मैं ही उन्हीको फोन करूंगा असे म्हटले आणि काही वेळानंतर मोदींनी स्वत:हून ॲड. दादा देशपांडे यांना फोन केला आणि त्यांना मी गुजरातचा मुख्यमंत्री...नरेंद्र मोदी बोलतोय...बँकेच्या वास्तू लोकार्पण सोहळ्याला येणार असल्याचे सांगितले आणि त्यांचीही आस्थेने चौकशी केली. एवढी मोठी जबाबदारी सांभाळणार्‍या मोदींनी आपल्याला स्वत:हून फोन केला याचे दादांना अप्रुप वाटत होते आणि अभिमानही. या घटनेवरून मोदींची संघाप्रती असलेली निष्ठा, समर्पण प्रतीत होते. ३ डिसेंबर २00३ रोजी नरेंद्र मोदी सकाळी विमानाने अकोल्यात आले. वास्तूचे लोकार्पण त्यांनी केले. हा नेत्रदीपक सोहळा अद्यापही अकोलेकरांच्या कायम स्मरणात आहे.