जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रुग्ण ७ एप्रिल २०२० राेजी महापालिका क्षेत्रात आढळून आला हाेता. त्यावेळी काेराेना विषाणूच्या साथीबद्दल प्रचंड धास्ती व भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. त्यानंतर शहराच्या विविध भागात एकापाठाेपाठ काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत हाेते. जून महिन्यापर्यंत शहरासह जिल्ह्यात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला हाेता. नाेव्हेंबर व डिसेंबरमध्ये काेराेनाबाधितांचा आलेख घसरला हाेता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा काेराेनाने डाेके वर काढले असून संसर्गाचा प्रचंड वेगाने प्रसार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा स्थितीत मनपा प्रशासनाच्यावतीने काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी उपाययाेजनांची अंमलबजावणी केली जात असली तरी प्रयत्न ताेकडे पडत असल्याची परिस्थिती आहे. उपाययाेजनांसाठी मनपाला निधीची आवश्यकता असून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
मनपाचा प्रस्ताव धूळखात
मनपाने काेराेनाचा मुकाबला करणाऱ्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेतील मानसेवी डाॅक्टर, अधिपरिचारिका, परिचारिका, लॅब टेक्निशियन, आशा वर्कर यांचे मानधन पत्रात नमूद केले आहे. काेराेना कालावधीत अधिग्रहीत केलेल्या सिटी बसच्या भाड्यापाेटी १ काेटी ३३ लाख रुपये तसेच वैद्यकीय यंत्रणेसह इतर कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायजर, हात माेजे, ऑक्सिमीटर, थर्मल गन, फवारणी अशा विविध कामासाठी एकूण २ काेटी १६ लाखांचा प्रस्ताव ३ मार्च राेजी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. महिनाभरापासून या प्रस्तावावर काेणताही निर्णय घेण्यात आला नाही,हे येथे उल्लेखनिय.
गतवर्षी ४० लाखांचा निधी
शहरात ७ एप्रिल २०२० मध्ये काेराेनाचा पहिला रुग्ण आढळून आला हाेता. त्यानंतर काेराेना बाधितांचा आकडा वाढत गेला. त्यानुषंगाने उपाययाेजनांसाठी गतवर्षी जिल्हा प्रशासनाकडून मनपाला ४० लाखांचा निधी प्राप्त झाला हाेता.
शहरात एकच काेविड केअर सेंटर
शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरीही रुग्ण उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये भरती हाेत नसल्याची परिस्थिती आहे. अशास्थितीत लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात एकमेव गुणवंत मुलांचे वसतिगृह काेविड केअर सेंटर कार्यान्वित आहे.
काेराेनाच्या अनुषंगाने मानधन, भाडे व साहित्य खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाकडे मार्च महिन्यांत प्रस्ताव सादर केला आहे. त्या प्रस्तावावर निर्णय झाला नाही.
-जे.एस.मानमाेठे मुख्य लेखापरीक्षक तथा लेखाधिकारी मनपा
जिल्ह्यातील एकूण रूग्ण-
सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण-
शहरात उपचार सुरू असलेले रुग्ण-