लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफीसाठी राबवली जाणारी ऑनलाइन प्रक्रिया फसवी असून, शेतकर्यांना नाहक ताटकळत ठेवले जात आहे. नवरात्रीच्या पहिल्या माळेपर्यंत शेतकर्यांना कर्जमुक्त करा, तसेच त्यांना बँकांद्वारे कर्जपुरवठा न झाल्यास उग्र आंदोलन उभारण्याचे निर्देश शिवसेना नेते, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आढावा बैठकीत शिवसैनिकांना दिले. शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते, तसेच पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खा. अरविंद सावंत यांनी गुरुवारी सेना पदाधिकार्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर आमदार श्रीकांत देशपांडे, मा.आ. संजय गावंडे, सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, दिलीप बोचे, महादेवराव गवळे, महिला संघटिका ज्योत्स्ना चोरे, माया म्हैसने, सुनीता मेटांगे, शहरप्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, तालुकाप्रमुख विकास पागृत, विजय माहोड, संजय शेळके, अप्पू तिडके, गजानन मानतकर, रवी मुर्तडकर आदी उपस्थित होते. शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन प्रणाली फसवी आहे. शेतकर्यांना होणारा त्रास पाहता शिवसेनेने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे निर्देश दिवाकर रावते यांनी दिले. आढावा बैठकीला सेवकराम ताथोड, हरिभाऊ भालतिलक, विजय मालोकार, बळीराम कपले, अरुण पारोळेकर, संजय भांबेरे, नगरसेवक गजानन चव्हाण, शशीकांत चोपडे, नगरसेविका मंजूषा शेळके, सपना नवले, देवश्री ठाकरे, राजेश्वरी शर्मा, अनिता देशमुख, संतोष अनासने, सर्कलप्रमुख दिनेश सरोदे, सागर भारूका, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, योगेश अग्रवाल, योगेश गीते, अश्विन नवले, नंदू ढोरे, राहुल कराळे, सचिन थोरात, केशव मुळे, नंदू तायवाडे, मनीष मोहोड, गजानन बोराळे, शहरप्रमुख विक्रांत शिंदे, सुनील रंधे, आनंद बनचरे, प्रवीण इंगळे, सतीश मानकर, अविनाश मोरे आदींसह जिल्हा परिषद सर्कलप्रमुख, पंचायत समिती सर्कलप्रमुखांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन प्रदीप गुरुखुद्दे यांनी केले.
अन् पदासाठी गटबाजीला उधाण!पक्षासाठी कवडीचेही योगदान नसणार्या काही पदाधिकार्यांनी पक्षात जागा अडवून ठेवल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांत तीव्र नाराजीचा सूर आहे. त्यामध्ये महिला पदाधिकार्यांचा समावेश आहे. दिवाकर रावते अकोल्यात येण्याची कुणकुण लागताच संबंधित पदाधिकार्यांनी त्यांच्याकडे पदावर कायम राहण्यासाठी ‘लॉबिंग’केल्याची माहिती आहे. रावते यांच्या पहिल्याच दौर्यात शिवसेनेत गटबाजीला उधाण आल्याची खमंग चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू होती.
स्वार्थ बाजूला ठेवा, कामाला लागा!निवडणुका डोळ्य़ासमोर ठेवून अनेकजण अचानक सक्रिय होतात. नेत्यांच्या पुढे-पुढे करतात. सर्वच पातळ्य़ांवर यशस्वी व्हायचे असेल, तर शिवसेनेचा भगवा घराघरांत पोहोचवा. स्वार्थ बाजूला ठेवून कामाला लागा. सर्वसामान्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा, असे मोलाचे मार्गदर्शन संपर्कप्रमुख तथा खा.अरविंद सावंत यांनी यावेळी केले.