- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप पिकांसाठी सध्या युरिया खतासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याच्या पृष्ठभूमीवर युरिया खत पाहिजे असेल तर, त्यासोबत दुसरेही खत घेण्याचा आग्रह करून, युरिया खताच्या कृत्रिम तुटवड्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्यात येत आहे.अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यात कापूस व इतर खरीप पिकांसाठी युरिया खताची शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे; परंतु मागणीच्या तुलनेत शेतकºयांना युरिया खत उपलब्ध होत नसल्याने, राज्यातील विविध भागात युरिया खताचा तुटवडा असल्याची परिस्थिती आहे. त्यामध्ये युरिया खताची मागणी करणाºया शेतकºयांना प्रारंभी युरिया खत उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते; मात्र युरिया खत पाहिजे असेल तर युरिया खातासोबतच पोटॅश, मॅग्नेशियम या खतांसह कीटकनाशके घेण्याचा आग्रह शेतकºयांना करण्यात येत आहे.त्यामुळे गरज नसताना इतर खतांसोबत शेतकºयांना युरिया खत घ्यावे लागत आहे. त्यानुषंगाने कृत्रिम तुटवड्याच्या नावाखाली युरिया खतासाठी शेतकºयांची लुबाडणूक करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे.
युरिया खताचा कृत्रिम तुटवडा आठवणी युरिया खताची मागणी करणाºया शेतकºयांना युरिया पाहिजे असेल तर युरियासोबत इतर खते घेण्याचा आग्रह विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. गरज नसताना युरियासोबत इतर खते घ्यावी लागत असल्याने, शेतकºयांची लुबाडणूक होत आहे. त्यामुळे यासंदर्भात कृषी विभागाने दखल घेण्याची गरज आहे.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, जि. अकोला
युरिया खतासोबत गरज नसताना दुसरे खत देण्यासाठी शेतकºयांना आग्रह करण्यात आल्याचे आढळून आल्यास संबंधित खत विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.- मुरली इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.