- नितीन गव्हाळेअकोला: वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाला चालना मिळावी, या उद्देशाने ‘आयआयटी’ खरगपूरच्यावतीने शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम’ सुरू केला आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून शाळांमधील विद्यार्थ्यांना आयआयटी खरगपूर येथे आमंत्रित करून त्यांच्यातील प्रतिभा, विज्ञान-तंत्रज्ञानातील रुची वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.आयआयटी खरगपूरच्यावतीने शाळांमधील निवडक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण जाणून घेण्यासाठी संधी दिली जाते. ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम’चे हे यंदाचे दुसरे सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये देशातील प्रमुख शहरांमधील एक हजार शाळांमधून निवडलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर त्यांची गुणवत्ता दाखविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले होते. या प्रोग्रामला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. आयआयटी खरगपूर विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील समस्यांबद्दल विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मदत करीत आहे. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम’ आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांना आयआयटी खरगपूरला भेट देण्याची संधी आहे. विजेत्यांना त्यांच्या संशोधनासाठी आयआयटी खरगपूरकडून सहकार्य मिळेल. ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम’ (वायआयपी) चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येईल. यात निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रकल्प सादर करणे, प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाला नोंदणी लिंकच्या माध्यमातून संघाची नोंदणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना आयआयटीच्या फॅकल्टी सदस्यांसह तज्ज्ञ संशोधक मार्गदर्शन करतील. दुसऱ्या टप्प्यात शंभर सबमिशनची निवड केली जाईल. त्यासाठी ५-१0 पानांमध्ये त्यांचे विचार, संशोधन आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी शाळांनी एचटीटीपी://बीएआरसीआयआयटीकेजीपी.कॉम/वायआयपी या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
देशभरातून ४00 संघांचा सहभाग‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम’मध्ये देशातील शाळांमधून सुमारे ४00 संघांनी सहभाग घेतला. यातील ११५ संघांना तीन फेºयांसाठी आयआयटी खरगपूर येथे निवडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधून भविष्यातील संशोधक शोधून त्यांचे विचार, त्यांचे संशोधन विकसित करून त्याचा देशाच्या विकासात हातभार लागावा, यासाठी वायआयपीसारखा उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा शाळा, विद्यार्थ्यांना फायदा घ्यावा.