शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

अवैध इमारतींवर संक्रांत; महापालिका बजावणार नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:58 AM

अकोला: महापालिका प्रशासनाच्या दप्तरी अवैध ठरलेल्या कमर्शियल तसेच रहिवासी अपार्टमेंटसह ‘हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंग’साठी मनपात प्रस्ताव सादर करणाऱ्या इमारतींवर संक्रांत आल्याचे दिसत आहे.

- आशिष गावंडेअकोला: महापालिका प्रशासनाच्या दप्तरी अवैध ठरलेल्या कमर्शियल तसेच रहिवासी अपार्टमेंटसह ‘हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंग’साठी मनपात प्रस्ताव सादर करणाऱ्या इमारतींवर संक्रांत आल्याचे दिसत आहे. महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार संबंधित इमारतींना नोटीस बजावल्या जाणार असल्याची माहिती आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे मालमत्ताधारकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील काही पदाधिकाºयांच्या अंतर्गत कुरघोडीमुळे शहरातील बांधकाम व्यवसायाची पूर्णत: वाट लागली आहे. या क्षेत्रात प्रवेश करणाºया नवख्या बिल्डरांना थोपविण्याच्या मानसिक तेतून १८६ इमारतींचा मुद्दा चव्हाट्यावर आणल्या गेला. त्याचे परिणाम बांधकाम व्यावसायिकांना भोगावे लागत आहेत. अवैध इमारतींच्या संदर्भात मनपातील सत्ताधारी भाजप व प्रशासनाने ठोस निर्णय घेणे अपेक्षित असताना तसे होत नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. मध्यंतरी डिसेंबर २०१५ पर्यंत उभारलेल्या अनधिकृत इमारतींना नियमानुकूल करण्याचा निर्णय घेत राज्य शासनाने हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंगची नियमावली लागू केली होती. या नियमावली अंतर्गत २०१७ मध्ये मनपा प्रशासनाने मंजूर ‘एफएसआय’पेक्षा अधिक बांधकाम केलेल्या इमारतधारकांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.शुल्क अवाजवी झाल्याने निर्णयात बदलहार्डशिपच्या नियमावली अंतर्गत मनपाच्या नगररचना विभागात सुमारे २०४ पेक्षा अधिक प्रस्ताव सादर झाल्याची माहिती आहे. या नियमावलीचे शुल्क अवाजवी असल्याचे खुद्द शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शुल्क कमी करण्याचा अधिकार मनपाच्या महासभेला देण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार होती, ती झालीच नाही. यादरम्यान मुंबई हायकोर्टाने हार्डशिपच्या नियमावलीतील काही निकष रद्द करण्याचा आदेश दिल्यामुळे शासनाची कोंडी झाली असून, अद्याप कायम आहे.कलम ५२ अंतर्गत नोटीसमनपाच्या दप्तरी १८६ इमारतींचे बांधकाम अवैध असल्याचे नमूद आहे. यापैकी सुमारे ७० तसेच इतर २०४ इमारतींचे प्रस्ताव हार्डशिप अंतर्गत मनपात पडून आहेत. संबंधित २७४ इमारतींना नगररचना अधिनियम कलम ५२ नुसार नोटीस बजावल्या जाणार आहे. या नोटीसनुसार संबंधित मालमत्ताधारक कलम ५३ नुसार मनपाकडे खुलासा सादर करू शकतील. त्यानंतर मनपा आयुक्त अवैध बांधकाम वैध करण्याबाबत निर्णय घेतील.

नोटीस बजावणे म्हणजे अवैध इमारतींवर कारवाई करणे, असा अर्थ होत नाही. कलम ५३ नुसार नागरिकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेता येतील.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका