जनता भाजीबाजाराच्या जागेवर वाणिज्य संकुलाचे आरक्षण आहे. या ठिकाणी वाणिज्य संकुल उभारण्याच्या सबबीखाली महापालिका प्रशासनाने काेराेना विषाणूचे कारण समाेर करीत या ठिकाणी हाेलसेल व किरकाेळ व्यवसाय करण्यावर निर्बंध आणले. ही बाब लक्षात घेता या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला व्यावसायिकांनी लाेणी मार्गावर जागा विकत घेऊन या ठिकाणी भाजीपाला विक्रीला सुरुवात केली; परंतु काही दिवसांनंतरच जनता भाजीबाजाराच्या जागेवर काही व्यावसायिकांकडून अवैधरीत्या भाजीपाल्याची हर्रासी केली जात असल्याचे समाेर आले आहे. यामुळे लाेणी मार्गावरील व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून, त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासन उदासीन असल्यामुळे लाेणी मार्गावरील व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाचे दरवाजे ठाेठावले आहेत. व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर शुक्रवारपासून तीनदिवसीय साखळी उपाेषणाला प्रारंभ केला आहे.
महापालिकेवर अविश्वास
मनपा प्रशासनाच्या सूचनेनुसार भाजीपाला व्यावसायिक व फळ विक्रेत्यांनी विविध ठिकाणी जागेची खरेदी करून त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला. जनता भाजीबाजाराच्या जागेवर अवैधरीत्या हर्रासी सुरू असून, याप्रकरणी मनपाने ठाेस कारवाई करणे अपेक्षित आहे. तसे हाेत नसल्यामुळे महापालिकेप्रति विश्वास नसल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.