कवठा शिवारात अवकाळी पावसाची हजेरी
कवठा : परिसरात गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत. मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
---------------
खेट्री परिसरातील शेतकरी चिंतित
खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री परिसरात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतित सापडले आहेत. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रकोप वाढल्याने शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.
----------------
टाकळी शिवारात गव्हाचे पीक बहरले !
बाळापूर : तालुक्यातील नांदखेड, टाकळी शिवारात यंदा रब्बी हंगामात गव्हाचा पेरा वाढला आहे. सध्या गव्हाचे पीक बहरले आहे. ढगाळ वातावरणामुळे गव्हावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतित सापडले आहेत.
-----------------------------------
चतारी-पिंपळखुटा मार्गाची दयनीय अवस्था
चान्नी : पातूर तालुक्यातील चतारी-पिंपळखुटा मार्गाची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने दररोजी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-------------------------
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मूर्तिजापूर: येथील जुनी वस्ती परीसरातील जूना हिरपूर रस्त्यावरील टांकवाडी येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
-------------------------
हातरुण-लोणाग्रा रस्त्याची दुर्दशा
हातरूण : परिसरातील हातरूण-लोणाग्रा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने वाहने चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-----------------------------------
जिल्हास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
पातूर: विदर्भ कलाशिक्षक संघाद्वारा आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी केले आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आशिष चौथे, प्रमोद गिते, राजेश्वर बुंदेले, संदीप शेवलकार उपस्थित होते.
------------------------
रब्बी हंगाम धोक्यात; शेतकरी अडचणीत
बोरगाव मंजू : परिसरात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रकोप वाढला आहे.
---------------------------
घरकुल योजनेचे काम बंद; लाभार्थी अडचणीत !
मूर्तिजापूर : शहरात काही महिन्यांपासून पंतप्रधान घरकुल योजनेचे काम बंद असून, लाभार्थी अडचणीत सापडले आहे. याकडे नगरपालिकाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लाभार्थींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन घरकुलांचे कामे सुरू करण्याची मागणी द्वारकाप्रसाद दुबे यांनी केली आहे.