बाळापूर तालुक्यातील काजीखेड, स्वरूपखेड, नागद, सागद, हाता, अंदुरा, सोनाळा या वाळू घाटातून दररोज जवळजवळ १०० ट्रक, ट्रॅक्टर या वाहनांव्दारे दिवसरात्र महसूल कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या डोळ्यासमोर निंबा फाटा येथून अकोला शहराकडे वाळू भरून जात आहेत. तसेच सद्यस्थितीत ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात घरकुलाचे बांधकामे सुरू असून प्रति ट्रॅक्टर ५ हजार रुपये दराने रेती विकल्या जात आहे तर प्रति ट्रक रेतीचे दर आठ ते दहा हजार रुपये आहेत. घरकुलधारकांना लागणाऱ्या वाळूची राॅयल्टी देण्याचा नियम शासनाने घातला असला तरी, तहसील कार्यालयातील कर्मचारी घरकुलधारकांना जाचक अटी व नियम सांगून राॅयल्टी देण्यास टाळाटाळ करत असल्याने शासनाचे गौण खनिजातून मिळणारे उत्पन्न बुडविण्यासोबत एक प्रकारे वाळूची चोरी करणाऱ्या वाळू माफियांना मदत करून आपले उखळ पांढरे करीत आहेत. तसेच अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी अर्थपूर्ण संबंधांमुळे कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. मात्र या कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शासनाचे लाखो रुपयाचे गौण खनिज चोरीला जात आहे. बाळापूर तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातील वाळू घाटावरून होणारी वाळू चोरी थांबविण्यासाठी वरिष्ठांकडून कारवाईसाठी मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. वाळू घाटांचा लिलाव होणेदेखील गरजेचे आहे. सदर वाळू घाटाचा लिलाव झाल्यास शासनाचा महसूल देखील बुडणार नाही.
फोटो:
बाळापूर महसूल विभाग झोपेत!
बाळापूर तालुक्याच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या तेल्हारा तालुक्यात तहसीलदार राजेश गुरव यांनी रेती चोरी करणाऱ्या माफियाच्या विरोधात कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली असून, आडसूळ व उमरी घाटावरून दोन दिवसांत दोनशे ब्रास रेती जप्त करून तेल्हारा तहसील कार्यालयात जमा केली आहे. बाळापूर तालुक्याच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या तेल्हारा तालुक्यात तहसीलदार राजेश गुरव यांनी रेती चोरी करणाऱ्या माफियाच्या विरोधात कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली असून आडसूळ व उमरी घाटावरून दोन दिवसांत दोनशे ब्रास रेती जप्त करून तेल्हारा तहसील कार्यालयात जमा केली आहे. बाळापूर तालुक्यात मात्र तहसीलदार आणि महसूल कर्मचारी कारवाई करण्यास पुढे येत नसल्यामुळे तालुक्यातील वाळू घाटावरून वाळू माफिया दररोज १०० ट्रक आणि ट्रॅक्टरने दिवसाढवळ्या वाळू चोरून नेत असल्याचे चित्र दिसत आहे.