शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

जिल्हा बदली अंतर्गत महापालिका शाळांमध्ये शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या!

By नितिन गव्हाळे | Published: July 18, 2024 9:36 PM

संचमान्यता, बिंदूनामावली प्रसिद्ध नसताना १७ शिक्षक रूजू कसे?

अकोला: जिल्हा बदलीअंतर्गत शिक्षण विभागाकडून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या करण्यात येत आहेत. सेवाज्येष्ठता यादी, संचमान्यता आणि बिंदूनामावली अद्ययावत करण्यात आली नसतानाही महापालिकेच्या उर्दू शाळांमध्ये १७ शिक्षक कसे रूजू करण्यात आले? असा सवाल महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पाठविलेल्या निवेदनातून केला आहे.

अकोला महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये सन २०१६-१७ पासून सेवाज्येष्ठता यादी, संचमान्यता आणि बिंदूनामावली अद्ययावत करण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्या संवर्गाचे शिक्षक कमी आहेत किंवा जास्त आहे. हे स्पष्ट झालेले नाही. असे असतानाही जिल्हा बदली अंतर्गत महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये १७ शिक्षक कसे काय रूजू करून घेण्यात आले? हा प्रकार नियमबाह्य असल्याचा आरोप उर्दू शिक्षक संघटनेने निवेदनातून केला आहे. तसेच महापालिकेचा शिक्षण विभाग म्हणतो की, यावर्षी उर्दू माध्यमाचे १२ शिक्षक कमी आहेत.

यावरून पुन्हा तीच पुनरावृत्ती करण्यात येत असल्याचेही निदर्शनास येत आहे. प्रशासनाचे आदेश नसताना, शिक्षण विभागाने सर्व बाबी तपासून, योग्य त्या शिक्षकांना समावेशित करून घ्यावे. प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय करू नये. अशी मागणीही राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सरदार खान, उपाध्यक्ष मगफूर अहेमद, कार्याध्यक्ष मो. हफीज शे. सईद, सचिव सै. रशीद फतेह मोहम्मद, सईद खान, शहजाद परवेज खान, शमा अंजूम अ. शकूर आदींनी केली आहे.

पूर्णवेळ प्रशासन अधिकारी द्याराज्य उर्दू शिक्षक संघटनेने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, महापालिकेच्या शिक्षण विभागात पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नसल्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. याबाबत वारंवार निवेदन, तक्रारी दिल्यानंतर दखल घेण्यात आलेली नाही. महापालिका प्रशासनाने शिक्षण विभागाला पूर्णवेळ प्रशासन अधिकारी द्यावा. अशी मागणी उर्दू शिक्षक संघटनेने केली आहे.

टॅग्स :Akolaअकोला