लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हास्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथक रविवारी गस्तीवर असताना रिधोरा परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाने दोन्ही ट्रक जप्त करून ट्रक मालकांना २ लाख ३० हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला. दोन्ही ट्रक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आले.जिल्हास्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथक हे रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास रिधोरा परिसरात गस्तीवर होते. यावेळी वाजिद खान याच्या मालकीचा एमएच ४३, एफ १४७७ आणि नासीर शेख याच्या मालकीचा एमएच ३३ ४८३३ क्रमांकाचा ट्रक वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आले. पथकाने ट्रक चालकांची चौकशी केली असता, या वाळूची रॉयल्टी नागपूर जिल्ह्यातील मौजे. अकोला (ता. रामटेक) आणि यवतमाळ जिल्ह्यातील मौजे. अकोला (ता. आर्णी) येथील होते; मात्र वाहतूक पासवर जास्त वेळ प्राप्त करण्याच्या उद्देशाने वाहतुकीचे चुकीचे ठिकाण नमूद करणे व एकापेक्षा अधिक फेºया मारण्याच्या उद्देशाने वाळू अकोला जिल्ह्यात उतरविली जात होती. यामुळे पथकाने वाजिद खान व नासीर शेख यांच्या मालकीच्या वाहनांना प्रत्येकी १ लाख १५ हजार ४०० दंड ठोठावला आहे.
वाळूची अवैध वाहतूक; दोन ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:37 PM