अकोट येथील टिप्पर एमएच ३० एव्ही १२४८ वाहनाने ३ ब्रास मुरूम वाहतूक करताना आढळले. यावेळी वाहन चालक दीपक बाबूलाल रावते रा. पोपटखेड यांच्याकडे गौण खनिज परवाना होता, मात्र एकाच परवान्यावर वेळेचे बंधन न पाळता दोनदा वाहतूक करण्याची दाट शक्यता असल्याचे महसूल पथकाला प्रथम दर्शनी दिसले. विशेष म्हणजे चालकाकडे परवाना नसल्याचे समाेर आले. वाहनाच्या वाहन क्षमतेत वाढ केल्याचा संशय पथकाला आला. चालकाने तसे बयाण दिले आहे. या टिप्परचा पंचनामा करून शहर पोलीस स्टेशन अकोट यांचेकडे सुपुर्दनाम्यावर वाहन सोपवण्यात आले आहे.
ही कारवाई नायब तहसीलदार हरीश बजरंग गुरव, तलाठी गोपाल वानरे, राजाभाऊ खामकर, विशाल शेरेकर यांनी केली. पुढील कारवाईकरिता तहसीलदार नीलेश मडके यांना अहवाल सादर केला आहे.