वाडेगाव येथून बाळापूरकडे देशी दारूची अवैध वाहतूक केल्या जात असल्याच्या माहितीनुसार वाडेगाव पोलिसांनी सापळा रचून दुचाकी क्रमांक (एम.एच. ३० बी.एच. ८४२८) जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी ९६ देशी क्वॉर्टर, दुचाकी असा एकूण ४४ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. ही कारवाई वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे, अमर पवार, विनायक पवार, गणेश गावंडे, योगेश सरप, गणेश नांगरे यांनी केली. पुढील तपास वाडेगाव पोलीस करीत आहेत. (फोटो)
-------------------------------
वारखेड फाट्यावर गावठी दारू जप्त
दानापूर : हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वारखेड फाटा येथे पोलीस नाकाबंदी करीत असताना वारी मार्गाने येत असलेल्या दुचाकीस्वारास अडविले. त्याच्याकडे दोन कॅन गावठी दारू दिसून आली. पोलिसांनी दुचाकीसह दोघांना ताब्यात घेत त्याच्याजवळून अंदाजे २० लिटर गावठी दारू व दुचाकी असा १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अक्षय विजय माकोडे, भारत भगवान तायडे दोन्ही (रा. माळेगाव बाजार) यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.