अकोला : परवानगीपेक्षा जादा रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक अकोला तहसील कार्यालयाच्या पथकाने सोमवारी गीतानगर भागात जप्त केला. याबाबत सायंकाळी तहसीलदारांकडून ट्रकमालकास नोटीस बजावण्यात आली असून, मंगळवारी दंड वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. एमएच ३0 एक्यू -00७७ क्रमांकाचा बाराचाकी ट्रक गीतानगरमध्ये रेती टाकण्यासाठी जात होता. चार ब्रास रेती ह्यरॉयल्टीह्णची पावती फाडून दहा ब्रास रेतीची वाहतूक करणारा ट्रक अकोल्याचे तहसीलदार संतोष शिंदे व मंडळ अधिकारी जितेंद्र तेलगोटे यांनी पकडला. ट्रक रात्री तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. रेतीची अवैध वाहतूक केल्याचे आढळून आल्याने, यासंदर्भात तहसीलदारांनी अकोट फैलमधील ट्रकमालक अलोक शुक्ला यांना नोटीस बजावली. ट्रकमालकाकडून एक लाखापेक्षा जास्त दंड वसुलीची कारवाई मंगळवारी तहसीलदारांकडून केली जाणार आहे.
रेतीची अवैध वाहतूक; ट्रक जप्त
By admin | Published: September 22, 2015 1:37 AM