अकोला : वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करताना आढळून आलेले तीन ट्रॅक्टर जप्त करून, टॅÑक्टरमालकांना ३ लाख ४६ हजार २०० रुपये दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी मंगळवारी केली.जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथक १६ मार्च रोजी रात्री गस्तीवर असताना अकोला तालुक्यातील सांगळूद येथील नाल्यात वाळूचे अवैध उत्खनन करून वाळूची अवैध वाहतूक करताना एमएच ३० एबी-८९८१, एमएच ३० एबी-५८७१ व एमएच ३७ एफ-२२३१ इत्यादी क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर आढळून आले. वाळूचे अवैध उत्खनन करून अवैध वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. प्रत्येकी १ लाख १५ हजार ४०० रुपयेप्रमाणे संबंधित तीन टॅÑक्टरमालकांना ३ लाख ४६ हजार २०० रुपये दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड यांनी केली. दंडाच्या रकमेची वसुली व पुढील कारवाई अकोला तहसीलदारांमार्फत करण्यात येणार आहे.