अकोला येथून बाळापूरकडे येत असताना, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी, रेतीची चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन क्र. एमएच २८ बीबी ११४५चा चालक व एमएच ३० ४१६६चा चालक व मालक यांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून दोन लाख १६ हजार रुपयांची रेती व वाहनाची अंदाजे किंमत १८ लाख असा एकूण २० लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही वाहने शेगावमधून अकोला येथे रेती वाहतूक करीत होते. उपविभागीय अधिकारी पुरी यांनी वाहनचालकांना वाहतूक परवाना मागितला. परंतु चालकाने पास न दिल्याने, वाहने बाळापूर पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश दिले.
चालक व मालकाविरुद्ध तलाठी गजानन भागवत यांच्या तक्रारीनुसार बाळापूर पोलिसांनी वाहनचालक व मालकाविरुद्ध भादंवि कलम ३७९, १८३, महसूल कायदा १९६६ नुसार १४३ गुन्हा दाखल केला. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.