अकोला : जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवर देवरी फाटा येथे अवैध कनेक्शन घेऊन पाण्याच्या अवैध वापरापोटी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अकोट उपविभगीय अभियंत्यांनी एका व्यक्तीवर १ लाख ४७ हजार १६ रुपयांची आकारणी केली केली असून, यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ७ डिसेंबर रोजी प्रस्ताव सादर केला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अकोट उपविभागांतर्गत अभियंत्यांनी ७ डिसेंबर रोजी ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीची पाहणी केली असता, देवरी फाटा येथे श्रीधर नारे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवरून २००५ पासून अवैध नळकनेक्शन पाण्याचा वापर केल्याचे निदर्शनास आले. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैध नळकनेक्शन घेऊन गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यांनी पाण्याचा अवैध वापर केला आहे. त्यामुळे अवैध पाण्याच्या वापरापोटी १ लाख ४७ हजार १६ रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा करण्याची नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे अकोट उपविभागीय अभियंता जी. के. हावडे यांनी देवरी फाटा येथील श्रीधर नारे यांना ७ डिसेंबर रोजी बजावली. तसेच यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला.
८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवर देवरी फाटा येथे अवैध नळकनेक्शन घेऊन २००५ पासून पाण्याचा अवैध वापराची १ लाख ४७ हजार १६ रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा करण्याची नोटीस देवरी फाटा येथील श्रीधर नारे यांना बजावण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
आर. ए .इंगळे
शाखा अभियंता, मजिप्रा, उपविभाग, अकोट