अकोला: जिल्हा परिषद सेस फंडातून ५२ सर्कलमध्ये पाच कोटींच्या रस्ते कामांचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले असले तरी, या कामांची अंदाजपत्रके आणि प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अद्याप रखडल्याच्या मुद्दय़ावर, जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यासोबत (सीईओ) शनिवारी चर्चा केली. त्यानंतर रस्ते कामांची अंदाजपत्रके तयार करून, कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश ह्यसीईओंह्णनी दिले. जिल्हय़ातील ग्रामीण भागातील रस्ते कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागाकडून अद्याप तयार करण्यात आली नाही. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये शनिवार, २0 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख यांनी शनिवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेऊन, चर्चा केली. त्यानुषंगाने सेस फंडातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी कामांची अंदाजपत्रके तयार करून, प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले.
रस्ते कामांसाठी तातडीने प्रशासकीय मान्यता द्या!
By admin | Published: February 22, 2016 2:23 AM