कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीवर बंदी घातली होती. शहरातील मानाच्या दोन्ही गणपतींचे विसर्जन कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून जागेवरच करण्यात आले. चंद्रशेखर आझाद गणपतीचे विसर्जन लाखपुरी येथे गणेश विसर्जन घाटावर करण्यात आले. मानाच्या हजारी गणेश मंडळाची महाआरती माजी नगरध्यक्षा द्वारका दुबे, समाजसेवक राजेंद्र मोहोड, प्रशांत हजारी, कैलास महाजन, गिरीश सगवी, चंद्रकांत तिवारी, आशिष हजारी, अनुज हजारी यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज वानखडे, शुभम मोहोड, गजानन लवाडे, राजू पेसोडे, सुनील पाचडे, हर्षल साबळे, संदीप खरबडकर, राकेश हर्जानी, पराग दहाडे, संदीप इंगोले, दर्शन उपाध्ये, लंका पांडे, पप्पू शुक्ला, सुकेश दुबे, अनुप उपाध्ये, शुभम शरमा, युवराज मोहोड, दिलीप कदम आदींनी परिश्रम घेतले.
-----------
पोलीस बंदोबस्त तैनात
गणपती विसर्जन कार्यक्रमस्थळी मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी इंगळे, जमादार भारसाकळे, आफिज, अमोल भांड, जाधव आदी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.