अकोला : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी वाढविण्यावर अनेकांचा भर दिसत आहेत. त्यासाठी मल्टी व्हिटॅमिन गोळ्या, औषधे आणि आयुर्वेदिक काढे घेण्यावर नागरिकांचा भर दिसत आहे; मात्र औषधांचे चुकीच्या पद्धतीने सेवन धोक्याचे ठरू शकते, असा सल्ला डॉक्टर देतात.जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने अगदी खेडोपाडी कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोनापासून लांब राहण्यासाठी अनेकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी विविध व्यायाम आणि खानपानात बदल करून सोबतीला मल्टी व्हिटॅमिन औषधे आणि विविध काढ्यांचे सेवन वाढले आहे. याशिवाय सोशल मीडियावर सुचविलेल्या विविध उपायांचाही अवलंबही नागरिकांकडून केला जात आहे. रोगप्रतिकारशक्तीबाबत जागरूक असणे आवश्यक असले तरी वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचा अतिरेक किंवा चुकीचे सेवन धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधांचे सेवन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.विविध घरगुती उपायमेडिकलवर मिळणाऱ्या रेडिमेट काढ्यांशिवाय विविध घरगुती उपाय नागरिकांकडून केले जात आहेत. त्यामध्ये गरम पाणी पिणे, हळदीचे दूध किंवा पाणी घेणे, वाफारा घेणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे आदी उपाय केले जात आहे.या औषधांची वाढली मागणीरोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध गोळ्या, औषधे बाजारात उपलब्ध असून, लहान मुलांसाठीचे सायरपही विक्रेत्यांकडे उपलब्ध असून झिंक, व्हिटॅमिन सी आणि मल्टी व्हिटॅमिनला सद्यस्थितीत सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. अनेकांकडून डॉक्टरांच्या सल्ल्याने तर काहींकडून परस्पर या औषधांचे सेवन केले जात आहे.अतिरिक्त औषध नुकसानकारकव्हिटॅमिन सी च्या गोळ्या रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घेतल्या जातात. अनेक जण सध्या मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्याही घेत आहेत; मात्र वय, गोळ्यांचे प्रमाण आणि वेळा याबाबत वैद्यकीय सल्ला गरजेचा असतो. कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, अतिरिक्त औषध सेवनाने नुकसान होऊ शकते.- डॉ. श्यामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी
इम्युनिटी बुस्टरचा अतिरेक ठरू शकतो घातक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 10:42 AM