बुलडाणा : पाळीव जनावरांमध्ये पावसाळ्यात होणार्या विविध आजारांना आळा घालण्यासाठी मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम विविध पशू चिकित्सालय कार्यालयांतर्गत राबवण्यात आली. या मोहिमेत अकोला विभागात ५ लाख ९९ हजार पशूंचे लसीकरण करण्यात आले. पावसाळ्यात जनावरांना अनेक आजार होतात. त्यामुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते, तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावर परिणामही होतो. त्यामुळे या जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात येते. यंदा एप्रिल ते ऑगस्ट अखेरपर्यंत यासाठी मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील पशुधनाचे संवर्धन व्हावे, शेतकर्यांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशातून विभागातील पाच जिल्ह्यात ५ लाख ९९ हजार ५४0 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यात जनावरांना होणार्या लाळ्या खुरकूत, घटसर्प, फ्या आणि एकटांग्या, फाशी व काळीपुळी, आंत्रविषार, आदी संसर्गजन्य आजारासाठी लसीकरण करण्यात आले. यासाठी पशु वैद्यकीय अधिकार्यांनी सहकार्य केले.
सहा लाख जनावरांचे लसीकरण
By admin | Published: September 16, 2014 6:38 PM