अकोला : स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सार्वजनिक शाैचालय आणि सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कामांची अंदाजपत्रके तयार करण्याची प्रक्रिया राज्यातील जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक शाैचालय आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांसाठी शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यातील जिल्हानिहाय गावांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सार्वजनिक शौचालये तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची अंमलबजावणी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सार्वजनिक शौचालय सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांसाठी अंदाजपत्रके तयार करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे. अंदाजपत्रके तयार झाल्यानंतर तांत्रिक मान्यता व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांसह सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाची कामे जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक शाैचालयांच्या कामांसाठी निधी प्राप्त!
स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक शाैचालय बांधकामांसाठी शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २५ जानेवारी रोजी जिल्हानिहाय गावांची निवड करण्यात आली. तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांसाठी १४ जानेवारी रोजी गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सार्वजनिक शाैचालयांच्या कामांसाठी शासनामार्फत प्रत्येक शौचालय बांधकामांसाठी तीन लाख रुपयाप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांना जानेवारीअखेर शासनामार्फत निधी प्राप्त झाला आहे.