लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सद्या आॅटोमोबाईल्स क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाला महत्व आहे. इनोव्हेशनला महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने इनव्हेंशन आणि इनोव्हेशन दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. देशातील उद्योगक्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत. नवनिर्मितीवर भर दिला जात आहे. असे टाटा मोटर्समधील हेड आॅफ कार्पोरेट क्वालिटी विभागाचे जनरल मॅनेजर डॉ. श्रीहरी पंढरीनाथ मांडवगणे यांनी शनिवारी सांगितले. आॅटोमोबाईल्स, कार्पोरेट क्षेत्राविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...
आपण कार्पोरेट क्षेत्राकडे कसे वळले?मांडवगणे : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अकोल्यात घेतल्यानंतर अमरावती बीई मॅकेनिकल गेले. एमई करीत असतानाच, टाटा मोटर्समध्ये सहायक व्यवस्थापकपदी रूजु झाला. हळूहळू एक-एक टप्पा पुढे जात, टाटा मोटर्सच्या हेड आॅफ कार्पोरेट क्वालिटीचे काम माझ्याकडे आले. या विभागात काम करताना, इनव्हेंशन आणि इनोव्हेशन कसे करायचे. याची माहिती मिळाली. हा विषय सर्वांसाठीच महत्वाचा आहे.
कार्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपनीत काम कशाला चालना दिली जाते?मांडवगणे : टाटा मोटर्समध्ये काम करताना, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेष म्हणजे, जमशेदजी टाटा, जेआरडी टाटा, रतन टाटा यांची सकारात्मक विचारसरणी, त्यांनी जी दिशा दिली. ती प्रेरणादायी आहे. टाटांनी कधीच व्यावसायिक म्हणून काम केले नाही. येथे तंत्रज्ञान, व्यवस्थापनेला महत्व दिले जाते. व्यावसायिकतेसोबतच समाजाला आपण काय देऊ शकतो. याचा विचार अधिक होतो.
नॅनो टेक्नॉलॉजी का मागे पडली?मांडवगणे : यावर मी भाष्य करू शकत नाही. टाटा व इतर उद्योगपतींमध्ये खूप मोठा फरक आहे. ते व्यावसायिक म्हणून विचार करीत नाहीत. कोणतेही तंत्रज्ञान हे समाजाच्या भल्यासाठी असले पाहिजे. हा दृष्टीकोन महत्वाचा आहे. परंतु समाज काय करतो. यावर त्या तंत्रज्ञानाचे भवितव्य अवलंबून राहते. तंत्रज्ञान का मागे पडले. यापेक्षा नवनिर्मिती करण्यावर अमचा भर आहे.भविष्यातील कंपनीचे धोरण काय आहे?मांडवगणे : आॅटोमोबाईल्स क्षेत्रात इलेक्ट्रीक कार, सीएनजीचा वापर असणाऱ्या कार येणार आहेत. हे नवीन तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्याला केंद्र शासनाचे सुद्धा पाठबळ आहे. कार व ट्रक निर्मितीचे काम आमच्या कारखान्यात चालते. सध्या आॅटोमोबाईल्समध्ये मंदीचे वातावरण आहे. बेरोजगारी वाढत आहे. यावर मात करण्यासाठी इनोव्हेशनची गरज आहे. शिक्षणासोबतच गुणवत्ता आवश्यक आहे. गुणवत्ता, अनुभव असेल तर संधीला वाव आहे. तरूणांनी शिक्षणासोबतच गुणवत्तेकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.