अकोला: पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापशी रोड येथील एका शेतकºयाच्या वहीतीत असलेल्या शेतात कुटुंबीयांसह जाऊन या शेतातील पिकाचे नुकसान करणाºया कापशी रोड येथील १४ आरोपींना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या न्यायालयाने विविध कलमान्वये मंगळवारी शिक्षा सुनावली. यासोबतच शेतकरी रामसिंग राठोड यांना नुकसान भरपाई म्हणून सर्व आरोपींना ८० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.कापशी रोड येथील शेतकरी रामसिंग नारायण राठोड हे कापशी शेतशिवारात ई-क्लासची गट क्रमांक १९ मधील शेती गत १५ वर्षांपासून वहीत करीत आहेत. याच शेतात कापशी रोड येथील छोटू ऊर्फ पुरुषोत्तम डिगंबर उमाळे, अंबादास गजानन उमाळे, कन्हैया बंसीलाल यादव, दिनेश छोटेलाल यादव, संदीप ऊर्फ भानू दिगांबर उमाळे, जगदीश बंडू यादव, बलवंत किसन आमले, अनिल लखन केवट, संजय ऊर्फ गोलू ऊर्फ शुभम रघुनाथ केवट, गजानन किसन तिडके, रवी रामसुमेर केवट, शुभम नंदलाल केवट, श्रीकृष्ण ऊर्फ किसन नथुजी उमाळे तसेच श्रीकृष्ण अमृता वडतकार या १४ आरोपींनी १५ आॅगस्ट २०१५ रोजी कुटुंबीय तसेच गुरा-ढोरांसह शेतात दाखल झाले. त्यानंतर शेतातील पिकांचे नुकसान केले. रामसिंग राठोड यांना ही माहिती मिळताच त्यांनी शेतात जाऊन या आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी शेतातील पीक निंदन केले तसेच राठोड यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामसिंग राठोड यांनी १८ आॅगस्ट रोजी पातूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर १४ आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, ४२७ तसेच सहकलम १४९, ५०४, ५०६ तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलम आणि ग्रामपंचायत अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पातूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश खोब्रागडे यांच्या न्यायालयाने सहा साक्षीदार तपासल्यानंतर सदर १४ आरोपींना भारतीय दंड विधान, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा तसेच ग्रामपंचायत अधिनियमाच्या विविध कलमान्वये शिक्षा ठोठावली आहे. यासोबतच ८० हजार रुपये दंड ठोठावला असून, ही रक्कम नुकसान भरपाई म्हणून शेतकºयास देण्यात येणार आहे. याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अॅड. श्याम खोटरे यांनी कामकाज पाहिले.
या आरोपींचा आहे समावेशकापशी रोड येथील शेतात नासधूस करणाºया आरोपींमध्ये छोटू ऊर्फ पुरुषोत्तम डिगांबर उमाळे, अंबादास गजानन उमाळे, कन्हैया बन्सीलाल यादव, दिनेश छोटेलाल यादव, संदीप ऊर्फ भानू दिगांबर उमाळे, जगदीश बंडू यादव, बलवंत किसन आमले, अनिल लखन केवट, संजय ऊर्फ गोलू ऊर्फ शुभम रघुनाथ केवट, गजानन किसन तिडके, रवी रामसुमेर केवट, शुभम नंदलाल केवट, श्रीकृष्ण ऊर्फ किसन नथ्यूजी उमाळे तसेच श्रीकृष्ण अमृता वडतकार या १४ आरोपींचा समावेश आहे