अकोला : नीती आयोगाने ‘एनसीआयएसएम’ या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा जाहीर केला असून, या मसुद्यातील काही मुद्दे आयुर्वेद, युनानी व सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांसाठी अन्यायकारक असल्यामुळे या मसुद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी या चिकित्सकांची देशव्यापी संघटना ‘निमा’ सरसावली आहे. आपल्या मागण्यांसाठी ‘निमा’कडून राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, ६ आॅक्टोबर रोजी ‘निमा’ अकोला शाखेच्यावतीने मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. नीती आयोगाद्वारे प्रस्तावित असलेला ‘एनसीआयएसएम’ या विधेयकाच्या मसुद्यातील काही मुद्दे भारतीय चिकित्सा पद्धतीचा अवलंब करणाºया डॉक्टरांना कसे त्रासदायक आहेत, याचा ऊहापोहच डॉ. कुळकर्णी यांनी केला. या प्रस्तावित विधेयकान्वये, भारतीय चिकित्सा पद्धतीचा अवलंब करणाºया डॉक्टरांची शिखर परिषद अर्थात केंद्रीय चिकित्सा परिषद (सीसीआयएम) बरखास्त होणार आहे. तसेच इंडियन मेडिकल सेंट्रल कौन्सिल अॅक्ट १९७० हा ४७ वर्षांपासून प्रचलित असलेला कायदा रद्द होणार आहे. हा कायदा भारतीय चिकित्सा पद्धतीचा अवलंब करणाºया डॉक्टरांना आधुनिक चिकित्सा पद्धतीचा अधिकार व दर्जा देणारा असून, तो रद्द झाल्यास या डॉक्टरांचा मूलभूत अधिकार व हक्क संपुष्टात येणार आहे. आपल्या हक्कासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्यात येणार असून, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, ६ आॅक्टोबर रोजी ‘निमा’ अकोला शाखेच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटीकेपासून सुरु झालेल्या या मोर्चात ‘निमा’ संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते. अत्यंत शांतपणे मार्गक्रमणा करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचला. तेथे जिल्हाधिकाºयांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन पंतप्रधानांकडे पाठविण्यात येणार आहे. मोर्चामध्ये संघटनेचे डॉ. आशुतोष कुळकर्णी, डॉसंजय तोष्णिवाल, डॉ. दिनेश राठी, डॉ. निखिल बक्षी, डॉ. मिलिंद बडगुजर, डॉ. वर्षा बडगुजर, डॉ, अनंत चतुर्वेदी, डॉ. दिलीप मानकर, डॉ. मनोहर घुगे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
‘एनसीआयएसएम’ विधेयकात सुधारणा करा!
By atul.jaiswal | Published: October 06, 2017 1:56 PM
अकोला : नीती आयोगाने ‘एनसीआयएसएम’ या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा जाहीर केला असून, या मसुद्यातील काही मुद्दे आयुर्वेद, युनानी व सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांसाठी अन्यायकारक असल्यामुळे या मसुद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी या चिकित्सकांची देशव्यापी संघटना ‘निमा’ सरसावली आहे. आपल्या मागण्यांसाठी ‘निमा’कडून राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्यात आले असून, त्याचाच एक भाग ...
ठळक मुद्दे‘निमा’ संघटनेचा मूक मोर्चा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर