अकोला : जिल्ह्यातील २०१९-२० यावर्षीच्या खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवार, ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यातील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४८ पैसे म्हणजेच ५० पैशापेक्षा कमी आहे.जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या सातही तालुक्यांतील एकूण १ हजार १२ महसुली गावांपैकी लागवडीयोग्य ९९० गावांची २०१९ -२० या वर्षातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील सर्व लागवडीयोग्य गावांमधील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४८ पैसे आहे. त्यानुसार जिल्ह्यातील लागवडीयोग्य गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असून, जिल्ह्यातील एकाही गावातील खरीप पिकांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त नाही.तालुकानिहाय लागवडीयोग्य गावांची अशी आहे पैसेवारी!तालुका गावे पैसेवारीअकोला १८१ ४८अकोट १८५ ४९तेल्हारा १०६ ४९बाळापूर १०३ ४७पातूर ९४ ४८मूर्तिजापूर १६४ ४७बार्शीटाकळी १५७ ४७..........................................................एकूण ९९० ४८परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान; पैसेवारीही कमी!जिल्ह्यातील सातही तहसीलदारांमार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आली. त्यानुसार सातही तालुक्यांतील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सोयाबीन, ज्वारी व कपाशी इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरीप पिकांची सद्यस्थितीचा विचार करून जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची सुधारित पैसेवारीही ५० पैशापेक्षा कमी आहे.