अकोला: सरकीच्या दरात पुन्हा सुधारणा झाल्याने कापसाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चीनमध्येही सध्या कापसाचे दर वाढले आहेत. चिनकडून भारतातील कापसाची मागणी वाढल्यास देशांतर्गत कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे; परंतु हे सर्व दोन्ही देशातील आयात-निर्यात धोरणांवर अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.गत आठवड्यात सरकीचे दर घटले होते. तथापि,दोन दिवसांपासून पुन्हा या दरात वाढ झाली असून, आजमितीस प्रतिक्ंिवटल २,४५० रुपयांवर हे दर पोहोचले आहेत. याचा फायदा कापसाच्या दरवाढीसाठी होणार आहे. सध्या खासगी बाजारात कापसाचे दर प्रतिक्ंिवटल ५,४५० ते ५,५५० रुपये आहेत. देशात आतापर्यंत जवळपास १ कोटी ५० लाख गाठी कापूस खरेदी झाल्याचे वृत्त आहे. कापूस वेचणी हंगाम सुरू असून, बाजारात सध्यातरी आवक संथ आहे. कापसाचे दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवल्याचे कापूस उद्योजक, व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.चीनमधील कापड व इतर उद्योगांना लागणाºया कापसाच्या तुलनेत तेथील कापसाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे चीनला कापूस आयात करावा लागतो. भारताकडून ही गरज भागविली जाते. त्यामुळेच यावर्षीही चीनला भारतीय कापूस निर्यात होईल, अशी शक्यता आहे; परंतु त्यासाठी या दोन्ही देशांच्या आयात-निर्यात धोरणांवर हे सर्व अवलंबून आहे.दरम्यान, शेतकºयांनी यावर्षी व्यापारी, भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळासह महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघालाही बराच कापूस विकला आहे; परंतु सीसीआय व पणन महासंघाकडे कापसाची प्रत बघून कापूस खरेदी केली जात असल्याने शेतकºयांनी व्यापाºयांना कापूस विकणे पसंत केले.
सरकीच्या दरात पुन्हा सुधारणा झाल्याने कापसाचे दरही आणखी वाढतील. चीनमध्येही कापसाचे दर वाढले आहेत; परंतु या दोन्ही देशांच्या आयात-निर्यात धोरणावर निर्यात अवलंबून आहे. कापूस निर्यात वाढल्यास दर वाढतील.- वसंत बाछुका,कापूस विपणन तज्ज्ञ,अकोला.