मूर्तिजापूर : चार वर्षीय रूचित श्वेता परेश बंग झाला "इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर". या वयात क्वचितच कोणी साध्य करु शकेल असे ध्येय जूनी वस्ती,मुर्तिजापूर स्थित रूचीतने ते साध्य केले आहे. त्याला ८६ देश व राजधान्या मुखोद्गत असून राजधान्या तो १.५३ मिनिटात सांगतो. इतकेच नाही तर भगवद् गीतेचे संस्कृत मध्ये असलेले २० श्लोक दोन मिनिटात बोलून दाखवतो. २५ पेक्षा जास्त स्वातंत्र्य सेनानींना तो फोटोवरून ओळखतो, अनेक सामान्य ज्ञान प्रश्नाची उत्तरे रुचित सहज सांगत असल्याने त्याचे नाव आता नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे रूचीतचे अद्याप शालेय शिक्षण सुरू व्हायचे आहे. परंतू हे ज्ञान त्याने टिव्ही बघून अवगत केल्याचे त्याचे पालक सांगतात. शैक्षणिक व कलात्मक वातावरण घरातच असल्यामुळे रूचीतला असाध्य असे ध्येय साध्य करायला अवघड गेले नाही. रुचितचे आई शिक्षिका असून वडील थ्रीडी जनेरलीस्ट आहेत, संपूर्ण घराणे उच्च शिक्षित असल्याने रुचित मध्ये अनुवांशिक गुण आल्याचे त्याच्या वडिलांनी 'लोकमत' बोलताना सांगितले.
चार वर्षाचा रुचित सांगतो काही मिनिटांत ८६ देश व राजधान्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 10:46 AM