अकोला : अकोला पूर्व मतदार संघात भाजप, उद्धव सेना आणि वंचित बहुजन आघाडी तिरंगी लढत झाली असून या भाजपचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी एकतर्फी निवडणूक करीत 48 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
अकोला पूर्व मतदार संघामध्ये आधीपासूनच भाजप, उद्धव सेना आणि वंचित बहुजन आघाडी या तीन पक्षांमध्येच चिरंजी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार खरी लढत ही उद्धवसेना आणि भाजप मध्येच झाल्याचे दिसून आले. निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा इफेक्ट दिसून आला. अकोला पूर्व मतदार संघामध्ये 24 व्या फेरी अखेर झालेल्या मतदानात उद्धव सेनेचे गोपाल दातकर यांनी 54 हजार 608 मते घेतली आहेत तर भाजपचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी एक लाख 2 हजार 911 मते घेतली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने हे 46567 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर हे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असून केवळ त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे.लाडक्या बहिणींचा मिळाला आशीर्वाद
रणधीर सावरकर यांच्या विजयाचा घोषणाची प्रतीक्षा अकोला-अकोला पूर्व मतदार संघामध्ये रणधीर सावरकर यांनी एकतर्फी बाजी मारत 26 व्या फेरी अखेर पन्नास हजार तीनशे अकरा मतांनी आघाडी मिळवली आहे. या निवडणुकीमध्ये रणधीर सावरकरांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक करत इतिहास रचला आहे. लाडक्या बहिणींचे आणि ओबीसी मतं आपल्याकडे खेचणार सावरकर यशस्वी झाल्याचे बोललेले जात आहे.
अकोला पूर्व मतदार संघातून यापूर्वी काँग्रेसकडून निळकंठ सपकाळ यांनी दोनदा तर भारिप बहुसं वंचित बहुजन आघाडीकडून हरिदास भदे यांनी दोन वेळा विजय मिळविला आहे. त्यानंतर भाजपचे रणबीर सावरकर यांनी हा मतदार संघ ताब्यात घेईल दोनदा येथून विजय मिळविला तर आता ते हॅट्रिक च्या उंबरठ्यावर असून त्यांच्या विजयाची केवळ घोषणा करणे बाकी आहे. अकोला पूर्व मतदार संघामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे गोपाल दातकर यांनी 26 व्या फेरी अखेर 56 हजार 256 मते घेतली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने यांनी पन्नास हजार एकशे साठ मते घेतली आहेत. या दोघांच्या मतांच्या बेरजेइतकीच मते रणधीर सावरकर यांनी घेतली आहेत. सावरकर यांनी 26 व्या फेरी अखेर एक लाख 7261 मते घेतली आहेत. त्यामुळे सावरकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे केवळ त्यांच्या विजयाची घोषणा करणे बाकी असून महायुतीतील घटक पक्ष व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये विजयी जल्लोष सुरू केला आहे.
दातकर व सुलताने यांची मतांची बेरीज एक लाख सहा हजारांवर कोल्हापूर मतदारसंघांमध्ये यंदा झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव सेनेचे गोपाल दातकर व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने यांनी एक लाख सहा हजार चारशे सोळा मते घेतली आहेत तर सावरकर यांनी या दोघाही उमेदवारांपेक्षा 851 मते अधिक घेतली आहेत. हे विशेष.
अग्रवाल यांच्या निकालामुळे विजय जल्लोष लांबला अकोला पश्चिम चे भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल हे सध्या पिछाडीवर चालत असल्यामुळे, रणधीर सावरकर यांच्या विजयाचा जल्लोष सध्या थांबलेला आहे.