अकोला - जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या २२ दिवसांमध्ये हजाराचा आकडा पार करीत १२५९ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ६५ गावांमधील ४३ हजार ४४६ पशुधन धोक्यात आले आहे. तसेच ६ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यात आले असून, तब्बल ७६ हजार ५९८ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
लम्पी आजाराचे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पशुरुग्ण आढळून आले आहेत. १२५९ बाधित जनावरांपैकी ३९१ जनावरे बरी झाली आहेत, तर ८६८ सक्रिय पशुरुग्ण आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत १ लाख ६५ हजार २०० लसीच्या मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. लम्पीमुळे मृत्यूचा आकडा वाढत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नागरिकांमध्येही धास्ती निर्माण झाली असून, दूध विक्री घटल्याचे चित्र आहे.
पशुपालकांनी घाबरण्याचे कारण नाही. लम्पी चर्मरोगाचा पशुरुग्ण आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
-डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त.
जिल्ह्यातील पशुधन
तालुका गाय वर्ग म्हैस वर्गअकोला ५२६६० १२२७२अकोट ३७०८४ ८६३३बाळापूर ३०३८७ ६७३७बार्शीटाकळी ३१६०३ ६८८५मूर्तिजापूर ३०६३८ ४३९७पातूर २४०६२ ४९७९तेल्हारा २६८३७ ५७९४एकूण २३३२७१ ४९६९७