शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात एक जण गंभीर जखमी; महान ते अकोला रस्त्यावरील घटना

By रवी दामोदर | Published: October 06, 2023 2:35 PM

या अपघातामुळे महान ते अकोला रस्त्यावर काही काळासाठी वाहतुकीचा खोळांबा निर्माण झाला होता.

अकोला:  महान ते अकोला रस्त्यावरील टिटवन फाट्यासमोर ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, अकोलाकडून महानकडे जात असलेल्या दुचाकी क्रमांक (एमएम.२८, ३८४५)  व महान येथून अकोलाकडे जात असलेल्या ट्रॅक्टर यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीचालक  गंभीर जखमी झाला. रस्त्यावरून जात असलेल्या नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला बोलावून गंभीर जखमीस सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातामुळे महान ते अकोला रस्त्यावर काही काळासाठी वाहतुकीचा खोळांबा निर्माण झाला होता. अपघातस्थळी बघ्याची गर्दी जमली होती. दरम्यान, या मार्गाने दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.