यावेळी ग्राम मधापुरी येथे अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह कामाचे भुमिपूजन, काँक्रीट रस्ताचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत ४५ दिवसाचे गवंडी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या योजने अंतर्गत सहा लाभार्थींना एकाच टप्प्यात एक रक्कमी १ लाख २० रुपयांचे ४५ दिवसात सहा लोकांचे घरकुल पूर्ण करण्यात आले. याकरिता पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ५ राज्यातील ५ बांधकाम तज्ञ मुलींची नेमणूक करण्यात आली होती. यावेळी लाभार्थी वसंतराव सगणे व विश्वनाथ दे.पवार व इतर दोन घरकुलांच्या कामाची व १५ व्या वित्त आयोगाच्या कामाची व विकास कामांची पाहणी केली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख, मधापुरी सरपंच प्रदीप ठाकरे ,भाजपा कुरुम जि.प.सर्कल प्रमुख संतोष शिरभाते, मिलिंद ठाकरे, अनंता विरुळकर, जिवन इंगोले, दिलीप सगळे, भैयालाल श्रीवास, रवी वहिले, अखिल भटकर, नितीन मुगल, कुलदीप पवार, रवी मोहिते, धनराज मोहिते, अजाब मोहिते, नितीन खलोरकर, मनोज पुरी, ज्ञानेश्वर डोंगरे, सागर रामकर उपस्थित होते.
फोटो: