अकोला : वन विभागाच्यावतीने आयोजित वन्यजीव सप्ताहाचे सोमवार १ आॅक्टोबर रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक एस. बी. वळवी, तर प्रमुख अतिथी म्हणून सहायक वनसंरक्षक नितीन गोडाणे, लिना आदे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे, नम्रता टाले, महिला आयटीआयचे प्राचार्य प्रमोद भंडारे, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वन्यजीव कक्षप्रमुख गोविंद पांडे यांची उपस्थिती होती.यानिमित्त वनपरिक्षेत्र कार्यालय ते उपवनसंरक्षक कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आयटीआयच्या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. सिरसाट यांच्या कलापथकाने वन्यजीवांची महती सादर केली. त्यानंतर समारोपीय कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मुखवटे रंगवा स्पर्धेत प्रगती लळे, वैष्णवी राठोड, कोमल पांडे, घोषवाक्य स्पर्धेत अंजली जामनिक, भाग्यश्री चातूलकर, शिल्पा कडू यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. उत्कृष्ट रॅली संचालनाकरीता पूर्वा राठोड यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश बिडकर, श्रीकांत हुंडीकर, दिनेश हरणे, संजय लांडगे, यशपाल इंगोले, अरुण वैराळे, विष्णू गोटे, अजय बावणे, प्रकाश गिते, धनंजय सुरजूसे, प्रिया तसरे, गीता भगत, नरेंद्र ओंकार, किशोर ठाकरे, अंजली महाळणकर, जयश्री चव्हाण, निवेदिता मानिकराव, सोनल कुळकर्णी, बबिता बोदडे, दिपाली कोटरवार, पे्रम तीवारी यांचे सहकार्य लाभले.